Sunday, February 27, 2011


"भाषासु मुख्य मधुरा दिव्या गीर्वाणभारती " इतके दिवस सुभाषितातच आपण हे वचन गोड मानत  होतो. पण १ एप्रिल २०११ पासून १ नवीन "संस्कृत पाक्षिक" आपल्या भेटीसाठी येत आहे! घाबरून जाऊ नका! हे पाक्षिक पूर्णपणे शुद्ध मराठी भाषेत असणार आहे! संस्कृत संदर्भातली अगदी लेटेस्ट माहिती आणि ओलडेष्ट ज्ञान अगदी साध्या सोप्या आणि सरळ समजेल उमजेल आणि रुचेल अश्या आपल्या "मराठी भाषेत" असणार आहे! कारण संस्कृतचे आणि माय मराठीच अगदी जवळच नात! काळाच्या प्रवाहात दोन्हीही भाषा हरवून जातील कि काय अशी थोडीशी शंका मनात येऊन जाते! पण तुम्ही आम्ही जर ठरवलं तर काहीच अवघड नाही. शाळेतल क्लिष्ट व्याकरण, शब्द पाठांतर वगैरे काही नाही बर का याच्यात! ह्यात असेल नवीन माहिती, जी आतापर्यंत कधीही ऐकली नाही न कुठे वाचली. काही ज्येष्ठ,अनुभवी आणि ज्ञानवृद्ध व्यक्तींच्या परीश्रमातून हे पाक्षिक आकार घेतंय . आजच्या "मराठी दिनाच्या निमित्ताने" हि माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचविण्यास मनापासून आनंद होत आहे! पाक्षिका संदर्भातील अधिक माहिती आपणा पर्यंत लवकरच ह्याच माध्यमातून पोहोचेल! आजच्या दिवशी सर्वाना हि नम्र विनंती कि सर्वानी ह्या येणाऱ्या पाक्षिकाचे स्वागत करावे! आणि आपणास अपेक्षित असणारी माहिती किवा या पाक्षिकाकडून असणाऱ्या अपेक्षा ९७६३७७६३३९ या क्रमाकावर फोन अथवा मेसेज करून जरूर कळवा!  आपणा सर्वाच्या शुभेच्छा या सदरास लवकरच लोकप्रिय बनवतील हि अपेक्षा!

No comments:

Post a Comment